पर्यटन व्यवसाय व रोजगार निर्मिती होण्यासाठी कुणकेश्वर येथे येत्या ४ व ५ नोव्हेंबरमध्ये रापण महोत्सवाचे आयोजन
पारंपारिक रापण हा मासेमारीचा व्यवसाय बदलत्या व्यवसायाच्या स्पर्धेत टिकून रहावा. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारी रापण यापुढेही कायमस्वरूपी सुरू रहावी. त्याची जगभरात प्रसिद्धी व्हावी आणि त्यातून पर्यटन व्यवसाय व रोजगार निर्मिती होण्यासाठी कुणकेश्वर येथे येत्या ४ व ५ नोव्हेंबरमध्ये रापण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे यांनी दिली.
देवगड तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, कुणकेश्वरचे माजी सरपंच चंद्रकांत घाडी, माजी नगरसेवक संजय तारकर, एकनाथ तेली, पर्यटन समितीचे सचिव अजित टाककर, दिग्विजय कोळंबकर, किरण पांचाळ, मिलिंद कुबल, अतुल आंबेकर आदी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, कुणकेश्वर येथे ४ व ५ नोव्हेंबरला रापण महोत्सव २०२३ चे आयोजन देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत कुणकेश्वर व कातवण रापण संघ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यात येत आहे. देवगड तालुक्यात आंबा व मासळी या दोन व्यवसायावरच अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यातच रापण मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय आजही देवगड तालुक्यातील सागरी किनार्यावर ना नफा ना तोटा या धर्तीवर येथील व्यावसायिक करत आहेत. गेल्या काही वर्षात व्यवसायातील स्पर्धेमुळे व मासेमारीच्या आधुनिक तंत्रामुळे रापण व्यवसायासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशावेळी हा व्यवसाय कालबाह्य न होता तो अधिकाधिक टिकून रहावा, तसेच नव्या पिढीला रापणीचे महत्व समजावे, यासाठी देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने रापण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सायंकाळी ६ वाजेपर्यंत रापण समुद्रात टाकून मासेमारी केलेल्या माशांचे जेवण येणार्या पर्यटकांना स्थानिक बचतगटांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यासाठी दहा स्टॉल असतील. यामध्ये माशांचे चविष्ट जेवण माफक दरामध्ये दिले जाणार आहे. यातून ताज्या माशांच्या जेवणाचा आस्वादही पर्यटकांना मिळणार आहे. तसेच शाकाहारी जेवणाचे दोन स्वतंत्र स्टॉलही उपलब्ध असणार आहे. यामध्ये उकडीचे मोदक, अळूवडी व अन्य पदार्थही उपलब्ध होणार आहेत. www.konkantoday.com