निवळी ग्रामपंचायतचा गाव पॅनलचे सरपंच तन्वी कोकजे यांच्या सहित ८ ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत
पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि तालुका प्रमुख बाबू म्हाप यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश*
रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावाचे गाव पॅनल ग्रामपंचायतच्या सरपंच तन्वी कोकजे आणि त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांसहित राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गावाला विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचे असेल विकास कामांच्या माध्यमातून गावात कायापालट करायचं असेल तर पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत गावाच्या भवितव्याच्या दृष्टीने आम्ही सर्व सदस्य आणि सरपंच यांनी पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली स्वीकारत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरती विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
रत्नागिरीमध्ये ना. उदयजी सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाचे काम करत असताना सुद्धा रत्नागिरीमध्येही शिवसेना मजबूत करण्याचे काम पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना गावच्या सरपंच यांनी सांगितले गावाच्या विकासासाठी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पुढार्यांनी आम्हाला शब्द दिले मात्र गावाच्या विकासासाठी निधी दिला नाही. मात्र पालकमंत्री यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली असून यापुढेही गावाचा विकास करायचा आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय सरपंच आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी घेतले असल्याचे सांगितले.
या प्रवेश दरम्यान उप जिल्हाप्रमुख राजेश मुकादम,तालुका प्रमुख बाबू म्हाप,राजू कोकजे राहुल सावंत उपस्थित होते.या प्रवेशा मध्ये सरपंच तन्वी कोकजे,ग्रामपंचायत सदस्य पूजा सुर्वे,सायली कोकजे,वैशाली पवार, दीपक देवरुखकर,विष्णूशेठ पवार यांनी प्रवेश केला आहे.
www.konkantoday.com