
दापोली शहरात अनधिकृत रित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडण्यात आल्याने मोठी खळबळ
दापोली शहरात अनधिकृत रित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक करण्यात येत होती यावेळी दापोलीचे तलाठी गुरुदत्त लोहार यांनी पकडून याची माहिती मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांना दिली.30 ऑक्टोबर रोजी सोमवारी दुपारी साडेबारा वा.च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपाजवळ हा दोन ब्रास वाळू भरून वाहतूक करणारा डंपर पकडला आहे. डंपर चालक परवेज मुजफ्फर सरखोत यांचा डंपर व वाळू दापोली तहसीलदारांनी जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणून ठेवले आहे. या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे. दोन ब्रास वाळू वाहतुकी प्रकरणाला एक लाख व अनधिकृतपणे वाहनातून केल्यामुळे एक लाख असा एकूण सुमारे दोन लाख रुपये दंड करण्यात आला आहे.
हा दंड भरल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दापोली तहसीलदार अर्चना घोलप बोंबे दिली आहे. अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक MH 46 F 7905 या वाहनातून दापोली तालुक्यातील अडखळ येथून ही वाळू दापोली येथे आणली जात होती याचवेळी हा डंपर पकडण्यात आला आहे.
www.konkantoday.com