कोकण रेल्वेची प्रवासी मालवातुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी
कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेने आपला ३३ वा स्थापना दिवस सोमवारी मोठया उत्साहात साजरा केला. यावेळी कोकण रेल्वेच्या गत ३३ वर्षाच्या कामगिरीची माहिती देताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने प्रवासी मालवातुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्याचे सांगितले.यावेळी संजय गुप्ता यांनी माहिती देताना कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे १०० विद्युतीकरण पुर्ण केल्याचे सांगितले. शिवाय आतापर्यंतचा सर्वाधिक ९६३.४३ कोटी रुपयांचा प्रवासी महसूल मिळवल्याचे तसेच ७६७.४७ कोटी रुपयांचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल प्राप्त केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ३२७४.७० कोटींचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्याबरोबरच ५१५२.२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे.
कोकण रेल्वेला आतापर्यंतचा सर्वोच्च २७८.९३ कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे सांगतानाच कोकण रेल्वेने यावर्षी लोडिंगमध्ये देखील आतापर्यंतची सर्वाधिक मजल मारल्याचे तसेच या कामगीरीत कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांचा मोलाचा वाटा असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
www.konkantoday.com