आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून उद्या गायक अभिजीत नांदगावकर यांच्या गाण्यांचे प्रसारण!
□ प्रसारण वेळ – 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता
रत्नागिरी :- आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता गायक अभिजीत नांदगावकर यांची गीते सादर होणार आहेत.
आकाशवाणी केंद्रावर नुकतेच 25 ऑक्टोबर रोजी या गीतांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. गायक अभिजीत यांची “सख्या तुझी वाट पाहू किती?, दिवाळी आली दिवाळी, गा रे प्रभूचे गाणे” अशी तीन गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. यातील “सख्या तुझी वाट पाहू किती?, दिवाळी आली दिवाळी” ही दोन नवी गाणी रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. या गीतांना अभिजीत यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केले आहे.
गायक अभिजीत यांना हर्षल काटदरे यांनी हार्मोनियम, उदय गोखले यांनी व्हायोलिन, तर अभिषेक भालेकर यांनी तबलासाथ केली आहे. या गाण्यांचे ध्वनिमुद्रण व बॅलन्सिंग रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी यांनी केले आहे. त्यांना प्रतिमा खानोलकर हिने सहकार्य केले.
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून गायक अभिजीत नांदगावकर यांची ही गाणी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता 1143 khz प्रसारित होणार आहेत. तसेच NEWSONAIR या LIVE MOBILE APP वर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून जगभर सर्वत्र हा कार्यक्रम रसिकांना ऐकायला मिळेल. तरी रसिक श्रोत्यांनी जरूर हा कार्यक्रम ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday com