खेड रेल्वे स्टेशन येथून दुचाकी लांबविली
खेड रेल्वे स्टेशन समोरील भागात उभी करुन ठेवलेली महिलेची ॲक्टिवा दुचाकी चोरांनी लांबवली आहे. खेड तालुक्यातील अलसुरे येथील महिला सौ. तरन्नुम बिलाल सहिबोले (३२) या स्वतःची अॅक्टिवा दुचाकी घेऊन खेड रेल्वे स्टेशनवर गेल्या. दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास स्टेशनच्या डाव्या बाजूच्या जागेत त्यांनी अॅक्टिवा उभी केली. तेथून परगावी जावून दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ३ : ४५च्या सुमारास परतल्या.
मात्र खेड रेल्वे स्टेशन समोरील महिला वेटींग रुमसमोरील भागात उभी केलेली त्यांची दुचाकी तिथं नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला मात्र, दुचाकी न मिळाल्याने पोलिस ठाण्यात अॅक्टिवाच्या चोरीची फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
www.konkantoday.com