रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात सुप्रसिद्ध पत्रकार उदयजी निरगुडकर यांचे व्याख्यान


येत्या शनिवारी दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात उदय निरगुडकर यांच्या “भारत @ 2045” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
झी वाहिनीमुळे घराघरात पोहोचलेले शब्दप्रभू पत्रकार उदय निरगुडकर हे 2017 पर्यंत झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. तसेच टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये 20 हुन अधिक वर्षे आयटी तज्ञ म्हणून ते काम पाहत आहेत. ते कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांच्या ‘भाषाकौशल्य’, ‘स्वयंशिस्त’ व ‘प्रामाणिकपणा’ या गुणांची छाप दिसून येते. लेखनक्षेत्रात ही ‘लोकल ग्लोबल’, ‘सी. इ. ओ.’, ‘निवडणूक जिंकण्यासाठी’ या पुस्तकांनी वाचकांच्या मनात घर केले आहे.
काळ झपाट्याने बदलतो आहे. कामानिमित्त होणाऱ्या परदेशवाऱ्यांमुळे ते अनेक जागतिक घडामोडींचे साक्षीदार आहेत. या घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे श्री. उदय निरगुडकर यांनी वारंवार आपल्या लेखांमधून, व्याख्यानांमधून मांडले आहे. श्री. निरगुडकर यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेला दिसून येणारे बदल काय काय आहेत… त्या बदलांचे संभाव्य परिणाम काय असू शकतील.. या बदलांमध्ये आपण नेमके कुठे आहोत… आपल्या देशाचे भवितव्य काय असेल… याचे अभ्यासपूर्ण विवेचन ते रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या माध्यमातून मांडणार आहेत. हे व्याख्यान रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले असून सर्व जागृत रत्नागिरीकरांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
Wwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button