
पोमेंडी खुर्द रामेश्वर वाडीत भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी व कामगार मोर्चा कोकण संयोजक लीलाधर भडकमकर यांचा सत्कार..
भाजपचे उपाध्यक्ष दिलीप काका पटवर्धन यांच्या पुढाकाराने व शरदशेठ नागवेकर यांच्या सहकार्याने पोमेंडी रामेश्वर मंदिराच्या आवरामध्ये रामेश्वर वाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती..या बैठकीमध्ये नवीन बूथ समितीची घोषणा तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी केली, या बूथ समितीचे अध्यक्ष पद कौशिक शरद नागवेकर यांच्याकडे देण्यात आले, दादा दळी यांनी कौशिक याला पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले. तर सचिव म्हणून प्रणम्य रणजित चालके याची निवड करण्यात आली. तर रवींद्र कुऱ्हाडे, कौस्तुभ नागवेकर, प्रसन्न कुऱ्हाडे, सुयश नागवेकर, जयवंत नागवेकर, यश नागवेकर, मनीष खाके, वेदिका नागवेकर, रितेश नागवेकर यांच्या बूथ समितीवर नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष दादा दळी व कामगार आघाडीचे कोकण विभागाचे प्रमुख लीलाधर भडकमकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर उपाध्यक्ष म्हणून दिलीप काका पटवर्धन यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी मारदर्शन करताना दादा दळी यांनी शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत घेऊन जा.. मोदी @ 9 अंतर्गत संपर्क ते समर्थन प्रत्येक घरो घरी जाऊन करावे असे आवाहन केले..पक्षाचे सर्व कार्यक्रम बूथ स्थरावर करा असे सुचित केले व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या..शक्तिकेंद्र प्रमुख राजा केळकर यांनी आभार मांडले. यावेळी शरदशेठ नागवेकर, दिलीप काका पटवर्धन व रामेश्वर वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantday.com