गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तरूणाचा मृत्यू
गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने यातूनच एका तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभिजित अशोक कोलगे (४१, कापसाळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कोलगे हे कापसाळ येथील जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतीशेजारी राहणारे असून त्यांनी १६ ऑक्टोबरला गवत जाळण्यासाठी वापरले जाणारे विषारी द्रव्य प्राशन केले होते.
त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागल्याने प्रथम उपचारासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ ऑक्टोबरला अधिक उपचारासाठी डेरवण येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना २८ ऑक्टोबरला त्याचे निधन झाले.
www.konkantoday.com