आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक
राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या व घरातील साहित्य जाळण्यात आले. त्यानंतर मराठा समाजबांधवांनी घोषणाबाजी करत माजलगाव शहरातील मुख्य मार्गांवरून रॅली काढली.यावेळी दगडफेकही करण्यात आली. यामुळे माजलगाव शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मराठा समाजबांधवांनी आक्रमक होत मोर्चा आ.सोळंके यांच्या घरावर नेला. तेथे समाजबांधवांनी दगडफेक केली. त्यानंतर घरात शिरून साहित्य बाहेर काढत घरालाच आग लावली. त्यानंतर बाहेर त्यांच्या गाड्याही पेटविण्यात आल्या. ही आग शमविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. परंतू आंदोलकांनी या गाड्या रस्त्यातच अडवल्या. त्यामुळे साहित्य व गाड्या आगीत खाक झाल्या.
www.konkantoday.com