राजापूर शहरातकाही दिवसांपासून मनोरूग्णाचा उच्छाद वाढला, एका मनोरूग्णाकडून गाड्यांची तोडफोड
राजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मनोरूग्णाचा उच्छाद वाढला असून गुरूवारी रात्री एका मनोरूग्णाने शिवाजीपथ रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. हा मनोरूग्ण बाजारपेठ खरेदीसाठी येणार्या नागरिकांनाही त्रास देत असल्याने प्रशासनाने त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
येथील अनेक वर्ष राजापूर शहरात मनोरूग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. या मनोरूग्णांच्या हरकतींनी सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. मध्यंतरी काही महिला मनोरूग्णही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत होते तर एका मनोरूग्णाने काही नागरिकांना त्याच्या हातातील काठीने मारहाण केल्याची घटनाही घडली होती. त्यानंतर या मनोरूग्णाला माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या माध्यमातून प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपचारासाठी रत्नागिरी मनोरूग्णालयात दाखल केले होते. मात्र काही कालावधीनंतर या मनोरूग्णाला पुन्हा सोडून दिले होते. त्यानंतर हे मनोरूग्ण पुन्हा राजापूर शहर बाजारपेठेत ठाण मांडून बसले आहेत.
www.konkantoday.com