
ज्याचे पोट रिकामे आहे, जो गरीब आहे,त्याला आरक्षण द्या. – रामदास कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट रिकामे आहे, जो गरीब आहे, त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारित आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा, ओबीसी मराठा व धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते, असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्तर्फे जीवनगौरव पुरस्कार रामदास कदम यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, शिक्षणतज्ज्ञ ऍड. एस. के. जैन, रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बॅंकिंग अभ्यासक विद्याधर अनास्कर आणि संजय आवटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, धायरी पुणे या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन झाले. एकनाथ खडसे म्हणाले, तरुणांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत. संकटाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. सकारात्मक विचारांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. मनामध्ये निराशा न आणता प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत राहिलो तर यश निश्चितच मिळते.
www.konkantoday.com