गुहागर तालुक्यातील १९५ शाळांपैकी ७१ शाळा
दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
गुहागर तालुक्यातील १९५ पैकी ७१ जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या शाळांच्या दुरूस्तीबाबत जिल्हापरिषदेकडून दुर्लक्ष होत असून यातील काही शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यातच तालुक्यात १५३ शिक्षकांची पदे रिक्त असून केंद्रप्रमुखांची संख्याही कमी आहे. यामुळे कमी कर्मचारी संख्येत कामाचा गाडा हाकताना गुहागर शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
www.konkantoday.com