केरळमधील विस्फोटानंतर मुंबई -पुणे अलर्टवर गृहमंत्री फडणवीसांचं मोठं विधान
केरळ एर्नाकुल येथील कलामासेरीच्य्या एका प्रार्थनास्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झालाय. तर ३६ ते ४० जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कलमासेरीतील ख्रिश्चन धर्माचे लोक प्रार्थना करत होते. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी या प्रार्थनास्थळी २ हजार जण उपस्थित होते.
या बॉम्बस्फोटानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय. दरम्यान केरळ विस्फोट प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. एनएसजी कमांडो घटनास्थळी पोहोचतील असं शाह यांनी फोनवरून सांगितलं.
राज्यातील मुंबई आणि पुण्यात अलर्ट देण्यात आलाय. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन अपडेट दिलीय. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केरळ विस्फोट प्रकरणावर भाष्य केलं. या घटनेनंतर नवीन असा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आम्ही सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्टवर राहत असते. त्यामुळे वेगळा असा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाहीये.
परंतु मुंबई आणि पूणे हे दोन्ही महत्त्वाचे शहरं आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहोत.
www.konkantoday.com