कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेह मेळावा उत्साहातघन कचरा प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचा ठराव मंजूर


रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा दिनांक 28 ऑक्टोबर रोजी कुवारबाव येथे विविध उपक्रमांनी उत्साहाने संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंबरे हे होते. त्यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे शुभेच्छापत्र आणि श्रीफळ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शंकरराव कदम, सचिव सुरेश शेलार, पदसिद्ध मार्गदर्शक शामसुंदर सावंत देसाई आणि वसंत पटवर्धन, सदस्य मुकुंद जोशी, सहकार्यवाह सुधाकर देवस्थळी, श्रीमती शुभांगी भावे, श्रीमती वृषाली घाणेकर, श्रीमती सुवर्णा चव्हाण, श्रीमती वंदना कोतवडेकर तसेच प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर आणि प्रकाश बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी शामसुंदर सावंत देसाई यांनी फेस्कॉनच्या राज्यस्तरीय संघटनेमार्फत ज्येष्ठांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नारायण नानिवडेकर यांनी ज्येष्ठाना वाचनाचा छंद जोपासण्याचे आवाहन केले. दिलीपराव साळवी यांनी माय केअर संस्थेमार्फत ज्येष्ठांना आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी दिल्या जाणाऱ्या विनामूल्य सुविधांची माहिती दिली. गरजूना टोल फ्री क्रमांक18005721343 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

सदस्य प्रभाकर कासेकर यांनी कुवारबाव नियोजित घनकचरा प्रकल्पासाठी जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने मंजुर व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचा ठराव सभेत मांडला आणि त्याला प्रकाश बोरकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो एक मताने संमत करण्यात आला. शेवटी संघाचे अध्यक्ष अंबरे यांनी जेष्ठाना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन स्नेह मेळाव्याची सांगता केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button