
आमदार भास्कर जाधव म्हणतात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतील तेव्हाच मराठ्यांना आरक्षण
मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनात येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नसल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. मराठा समाजाचा आता संयम सुटत असेल तर तो का सुटतो याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
रत्नागिरीत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी मराठ्यांना टिकाऊ स्वरूपात आरक्षण दिले होते. मात्र त्यानंतर नव्या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याची टीका त्यांनी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी आतापर्यंत कधी देवेंद्र फडणवीस गेल्याचे तम्ही पाहिले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेवर बोलताना जाधव म्हणाले की, दिल्लीच्या वेशीवर १३ महिने आंदोलन करणार्या शेतकर्यांचे आंदोलन व त्यातील मृत्यू पाहता या शेतकर्यांकडे दुर्लक्ष करणार्या पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांनी काय केले हे विचारण्याचा अधिकारच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com