
अजित पवारांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती
अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्वीट केलं आहे.डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
प्रफुल्ल पटेल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. अजित पवार पूर्ण बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी परततील
www.konkantoday.com