सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरात तब्बल ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा गांजा पकडला


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरात तब्बल ३८ हजार ८०० रुपये किंमती चा १ किलो ११० ग्रॅम वजनाचा गांजा सिंधुदुर्गच्या एलसीबी पथकाने २६ ऑक्टोबर ला रात्री उशिरा पकडला.कणकवली शहरातीला एका नामांकित हॉटेल समोरील सर्व्हिस रोडवर हॉटेल समोर एलसीबी पथकाने ही मोहीम फत्ते केली.या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साटम (वय ४४ रा. जानवली गावठणवाडी ) व चेतन रामू जाधव (वय २० वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

५० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, १८० रुपये आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली.
www.konkanhtoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button