सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मनसे रत्नागिरी शहरतर्फे संपूर्ण पोलीस खात्याचे आभार


गेले दीड महिना सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मनसे रत्नागिरी शहरतर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक व शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेत संपूर्ण पोलीस खात्याचे आभार मानण्यात आले.दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रउत्सव हे सण सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरे होतात अशावेळी कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस खात्यावर असते पोलीस बांधव नेहमीच आपल्या घरातील सणसमारंभ विसरून या जबाबदारी साठी सज्ज असतात संपूर्ण उत्सव काळ कोणतेही गालबोट न लागता निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस खाते बजावत असलेल्या कर्तव्याप्रती मनसे कायम कृतज्ञ आहे अश्या आशयाचे आभारपत्र व पुष्पगुच्छ देत मनसे पदाधिकाऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, शाखाध्यक्ष साहिल वीर, ओंकार सिनकर आदी पदाधिकारी -महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button