
वेळासमध्ये एकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोरील भोसले यांच्या पानटपरीजवळ एकास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर खेड येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप विश्राम धाडवे यांनी येथील पोली स्थानकात तक्रार दाखल केली.
स्वप्नील रंगराव घाटगे (३८, शिवतरोड खेड), निलेश रामचंद्र जगताप (३५), सुशांत रंगराव घाटगे (३०), शैलेश भगवान चव्हाण (३४, सर्व रा. वेरळ) अशी गन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या चौघांनी संगनमताने किरकोळ कारणावरून मारहाण करत दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
www.konkantoday.com