माणुसकी ओळखून समाजामध्ये काम करा, योगिता डेंटल कॉलेजच्या पदवीदान कार्यक्रमात पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले भावनिक आव्हान
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांचा २०१८च्या बॅचचा दिक्षा सोहळा समारंभ आज राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत खेड येथे पार पडला. यावेळेस या कार्यक्रमासाठी शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
▫️ या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी पालक आणि इतर मान्यवरांना ना.पालक मंत्री उदयजी सामंत यांनी मार्गदर्शन केले.माणुसकी ओळखून समाजामध्ये काम करने गरजेचे असल्याचे योगिता डेंटल कॉलेजच्या पदवीदान कार्यक्रमात पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले भावनिक आव्हान केले.
डॉक्टर म्हणून बाहेर पडताना सामाजिक काम आपल्या हातून घडेल आणि समाजाला उपयोग होईल असे काम करा असे ही सांगितले.
शिवतेज संस्थेचे योगिता डेंटल कॉलेज या रोपट्याचे वटवृक्ष झाले हे जिल्ह्याचा पालकमंत्री मला अभिमान आहे. ज्या आई-वडिलांनी तुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी अहोरात प्रयत्न केले त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांचा आत्मविश्वास संपादित करा असेही पालकमंत्री सामंत यांनी आवाहन केले. २०१८ ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान कार्यक्रमात गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मंडणगड दापोलीचे लोकप्रिय आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, कॉलेजच्या डीन डॉ.वर्षा जाधव, सीईओ डॉक्टर हेमांगी पोळ, संस्थेचे खजिनदार श्री सकपाळ सैनिकी स्कूलचे प्राचार्य महादेव खोत, विद्यार्थी, संस्थाचालक,पालक संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com