महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप


झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.भाऊ कदमपासून ते स्नेहल शिदमपर्यंत सर्वच कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांची भट्टी जमली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. पण अलीकडे हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. यादरम्यान अनेक पर्व आणि विविध उपक्रम राबवले गेले.होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा अनोख्या ढंगाने प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला गेला. पण याला काही यश आले नाही. ‘चला हवा येऊ द्या’ची लोकप्रियता अधिकच ओसरली. यामुळे टीआरपी देखील घसरला. त्यामुळे आता ‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे म्हणाले, ”चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button