
चिपळुणातील दोघांना राज्य कबड्डी असो. चे पुरस्कारकबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिन अर्थात कबड्डीदिनी
प्रतिवर्षाप्रमाणे राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने दिला जाणारा ज्येष्ठ पंच म्हणून विलास गुजर यांना तर ज्येष्ठ निवेदन म्हणून अमोल टाकळे यांना प्राप्त झाला आहे. हे पुरस्कार १५ रोजी २४ व्या कबड्डीदिनी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले जाणार आहेत.गुजर हे १९९२ रोजी राज्य पंच परीक्षा तर २००३ रोजी राष्ट्रीय पंच परीक्षा पास झाले असून पंच म्हणून राष्ट्रीय व राज्यस्तरीय कबड्डीस्पर्धेत अनेकदा सहभागी झाले आहेत.याचबरोबर कबड्डी स्पर्धेदरम्यान सुपरिचित निवेदक म्हणून ओळख असलेले व टेरव येथील सुमन विद्यालयाचे शिक्षक अमोल टाकळे यांना सुप्रसिद्ध कबड्डी निवेदक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. टाकळे हे गेली अनेक वर्षे जिल्हा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवेदन करत आहेत. गुजर व टाकळे यांच्या कार्याची दखल घेवून राज्य संघटनेने नियुक्त केलेल्या परीक्षक मंडळाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.www.konkantoday.com