
पुण्यात इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला आग, काही मिनिटांत गाडी जळून खाक!
गेल्या अनेक दिवसांपासून इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये आग लागल्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे दुचाकी चालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या जवळ आज सकाळी साडेआठच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला. डिक्कीमध्ये लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं. दरम्यान, तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये अचानक आग लागल्याच्या घटनेने वाहन चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
www.konkantoday.com