काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना विचारला जाब
रत्नागिरी नगर परिषदेकडे दिलेल्या समस्यांच्या प्रलंबित निवेदनावर कोणती कारवाई करण्यात आली याचा जाब कॉंग्रेसने विचारला.रत्नागिरी नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचे मुख्य केंद्र झाले आहे असा आरोप करत काही दिवसा पूर्वी काँग्रेसने शहरातील विविध समस्यांची निवेदने प्रशासनाकडे दिली होती. या निवेदनाचा पाठ पुरावा करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि सामान्य जनता एकत्र जमून त्यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला. यावेळी कॉंग्रेस प्रवक्ते कपिल नागवेकर म्हणले कि, रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील शिवाजी स्टेडियम मधिल चालू असलेला भ्रष्टाचार ह्याचा निवेदनाचा कोणताच प्रतिसाद दिला गेला नाही. कंत्राटदार आपल्याच पद्धतीने कामे काढत आहेत त्यांना विचारणा केली असता नगरपरिषद अधिकारी व आम्ही ठरवून कामे काढतो अशी उत्तरे मिळत आहेत. तसेच तीन महिन्यापूर्वी किल्ला विभागामध्ये साळवी यांच्या घरा मागचे जनतेचे लाखो रुपये खर्च करून गटाराचे काम केले गेले होते, परंतु ते कोसळले अश्या परिस्थितीत सुद्धा त्या कत्राटदाराचे पेमेंट केले जाते. याबाबत प्रशासकीय अधिकारी श्री. माने ह्यांना विचारणा करण्यात आली. तसेच रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याचीही दूरध्वनीवरून चर्चा करून यासर्व गोष्टीना विलंब का होत आहे याची विचारणा आम्ही केली असे नागवेकर यांनी सांगतिले.
ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यावेळी म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे देखभालच्या नावावर सामान्य जनतेचे हजारो रुपये खर्च होतात पण देखभालीच्या नावावर निव्वळ भ्रष्टाचार आहे असा आरोप काँग्रेस तर्फे दीपक राऊत यांनी केला.
त्यावेळेस आम्ही तुम्हाला दोन दिवसात लेखी आश्वासक उत्तर देऊ असे उत्तर प्रशासनाकडून काँग्रेस पदाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे, प्रदेश सचिव सुस्मीता सुर्वे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, तालुका सरचिटणीस काका तोडणकर, प्रमोद सक्रे, सुबोध कुंटे, कैलास कुबल, दर्शन सक्रे, इत्यादी कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
www.konkantoday.com