रत्नागिरी शहरातील वरचा फगरवठार येथे किरकोळ वादातून पती-पत्नीला मारहाण
रत्नागिरी शहरातील वरचा फगरवठार येथे किरकोळ वादातून पती-पत्नीला मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. मनाली दिनेश वालम (३०) व दिनेश विश्वास वालम (रा. वरचा फगरवठार, रत्नागिरी) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी मारहाण करणार्या संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
अमोल शंकर आलीम (रा. कर्ला, रत्नागिरी) व रोहित पांडुरंग पोकळे (रा. वरचा फगरवठार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार मनाली वालम व संशयित आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून २४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १० च्या सुमारास मनाली व दिनेश वालम यांना काठीने तसेच हाताच्या ठोशाने मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मनाली यांनी शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरूद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ४२७ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.