रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या विविध मानवी वीज दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू
अनेकदा दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणाने वीज दुर्घटना घडल्याचे ऐकायला मिळते. अनेकदा या सारख्या दुर्घटनांमध्ये पाळीव प्राण्यांसोबतच मानवाला देखील इजा होते. वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या विविध मानवी वीज दुर्घटनांमध्ये ११ जणांचा व त्यासोबतच ३१ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांत अनेक जीव गेले आहेत. विद्युत निरीक्षण विभागाने ही माहिती दिली.
पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून काळजी घ्यावी लागते. काहीवेळेला विजेच्या तारा खुल्या असतात. या लटकलेल्या असतात. याला स्पर्श झाल्यास अशा घटना घडतात. विद्युत निरीक्षण विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात मानवी नुकसान झालेल्या ११ वीज अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला तर अन्य ९ वीज अपघातात ११ जण सुरक्षितरित्या बचावले आहेत. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांविषयक झालेल्या एकूण २६ वीज अपघातांमध्ये ३१ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.