डेरवण येथे वालावलकर रूग्णालयात फिनोलेक्सतर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबीर
मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. या नवरात्रीच्या निमित्ताने महिला सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत डेरवण येथे वालावलकर रूग्णालयात संकल्प २०२३ मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले.
या शिबिराचा प्रवास २०१४ मध्ये परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे सुरू झाला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नवरात्रीच्या सणाची संधी घेवून ही शिबिरे वर्षातून दोनदा आयोजित केली जात आहेत. या शिबिरांचा ४००० पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे.
या शिबिराचे उदघाटन पोलीस अधिकारी श्रीमती धनश्री करंजीकर, सौ. अल्बुर्ग, अध्यक्ष ऑपरेशन फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या पत्नी, वालावलकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांच्या हस्त झाले.