
10 वर्षात काम न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवलं-नितेश राणे
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा 48 हजार मतांनी विजय झाला आहे. निकालानंतर राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज सकाळी नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर घणाघात टीका केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे म्हणाले की, गेल्या 10 वर्षात काम न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवलं आहे. जनतेने राऊतांना मुंबईचे तिकीट मी सांगितल्याप्रमाणे काढून दिलं आहे अशी टीका विनायक राऊत यांच्यावर केली.पुढे ते म्हणाले की, खासदार नारायण राणे यांनी गेली 40 वर्षे आपले सर्वस्व पणाला लावत सिंधुदुर्गवासियांची सेवा केली. त्या जनतेने मतदानाच्या रुपाने त्यांना आशिर्वाद दिले. कोकणातून उध्दव ठाकरे सेनेला जनतेने हद्दपार केले आहे. खासदार म्हणून नारायण राणे यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मात्र, काहीजणांचे हिशोब चुकते करायचे असून आगामी काळात ते व्याजासहीत चुकते केले जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.पुढे नितेश राणे म्हणाले की, आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार निवडून आला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे नेते सातत्याने सांगत होते. ते म्हणजे यापुढचा खासदार हा कमळ या चिन्हाचा असेल. कारण येथील जनतेने ठरवेल होते. विनायक राऊत यांना घरी बसवायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले समर्थन देण्यासाठी जनतेने हा निकाल दिला. या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. खासदार नारायण राणे यांनी गेली 40 वर्षे केलेली जनतेची सेवा आणि आपल्या जीवनातील पणाला लावलेले सर्वस्व, त्याची पोचपावती आणि आशीर्वाद जनतेने दिले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेही आम्ही आभारी आहोत. रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालक कसा असावा? हे समजते. एक नेतृत्व काय करु शकत? हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपा पक्ष आणि महायुती कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केलं. त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या निकालात मॅन ऑफ द मॅच देण्यासारखे काम शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. तसेच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि त्यांचा पक्ष पाठीशी राहिला असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.www.konkantoday.com