
ओरोस येथे धडक कारवाई , टेम्पोतील 64 लाख 80 हजार रुपयांची दारू जप्त
गोवा राज्यातून अवैधरित्या छुप्या पध्दतीने होणाऱ्या दारुच्या वाहतूकीवर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस येथे धडक कारवाई केली. या कारवाईत टेम्पोतील 64 लाख 80 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.हा टेम्पो दारू घेऊन गोवा ते पुणे निघाला होता. या प्रकरणी टेम्पोचालक मयूर भगवान चव्हाण आणि दिलीप झुंबर चव्हाण या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ओरोस महामार्गावर गाड्यांची तपासणी सुरु होती. त्यावेळी हा मालवाहू टेम्पो तपासणीसाठी थांबवण्यात आला. यावेळी गाडी तपासणी केली असता गोवा बनावटीची दारू सापडली. टेम्पोमध्ये एकूण 900 बॉक्स दारु होती. त्याची किंमत 64 लाख 80 हजार रुपये आहे. या दारूबरोबरच टेम्पोही जप्त करण्यात आला. ही कारवाई आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग अधीक्षक व्ही. व्ही वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक शरद जाधव, सत्यवान भगत, दुय्यम निरिक्षक विशाल सरवटे, वाहनचालक जगन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
www.konkantoday.com