
आशा, गटप्रवर्तकांचे आज रत्नागिरीत सत्याग्रह आंदोलन
दरमहा किमान वेतन, ऑनलाईन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक यांनी सुरू केलेल्या संपाची दखल राज्यस्तरावरून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो आशा, गटप्रवर्तक आज २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलनासाठी धडकणार आहेत.
या आंदोलनासाठी जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक जिल्हा परिषदेत एकवटणार आहेत. त्या ठिकाणाहून मोर्चाने त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असल्याची माहित महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे (आयटेक) अध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिली.
www.konkantoday.com