३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित होऊन दसरा दिवाळी ठेव योजना प्रतिसाद प्राप्त करत आहे. – ॲड.दीपक पटवर्धन
दसरा दिवाळी ठेव योजनेत आजपर्यंत ३ कोटी ४७ लाख जमा झाले असून आजपर्यंत २५९ ठेवीदारांच्या माध्यमातून हे ठेव संकलन झाले आहे.
संस्थेच्या ठेवी २९२ कोटी झाल्या असून दसरा दिवाळी ठेव योजनेत ३०० कोटींच्या समिप ठेवी नेण्याचा प्रयत्न आहे. विश्वासार्ह पारदर्शक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा पर्याय निवडतात त्याची प्रचिती सातत्याने घेताना वेगळे समाधान प्राप्त होते.
ठेव वृद्धीमासात स्वरूपांजली ठेव योजनेत १२ ते १८ महिने कालावधीसाठी ८.००% सर्वसाधारण तर ८.२५% ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी हा व्याजदर आहे. तर सोहम ठेव योजनेत १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) या कालावधीसाठी ८.२५% सर्वसाधारण तर ८.५०% ज्येष्ठ नागरिक व महिला यांना हा व्याजदर असून ८.६०% दराची योजना ५ लाख किंवा अधिक रक्कमेच्या गुंतवणुकीस देण्यात आला आहे. सर्वदूर ठेवीदारांबरोबर संपर्क करण्यासाठी ॲड.दीपक पटवर्धन अध्यक्ष यांनी पत्र पाठवली असून वाढता प्रतिसाद ठेव वृद्धीमासात प्राप्त होत आहे. सर्वच शाखा कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेव संकलित होत असून जुने आणि नवीन ग्राहक या ठेव योजनेचा लाभ घेत आहेत. सणासुदीच्या या कालखंडात आपली बहुमोल ठेव स्वरूपानंदमध्ये गुंतवून ठेवीदारांनी ठेव योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com