सेवानिवृत्त कर्मचारी दीपक मोहिते यांचा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर १ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा


निवृत्त कर्मचाऱ्याचा उपोषणाचा इशारा
खेडः आरोग्य विभागाच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी दीपक मोहिते यांनी रजा रोखीकरणाच्या देयक देण्याबाबत उपसंचालक कोल्हापूर विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सगरे यांनी वाटण्याच्या अक्षता दाखवल्या. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी दीपक मोहिते यांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर १ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा दिला आहे. मोहिते हे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ लिपिक पदावर असताना ३१ जानेवारी २०२२ ला सेवानिवृत्त झाले; पण आजतागायत रजा रोखीकरणाचे देय रक्कम अदा न केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button