लोटेमाळ-माळवाडी येथे ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस

खेड तालुक्यातील लोटेमाळ-माळवाडी येथे घरासमोर उभी करून ठेवण्यात आलेली ६० हजार किंमतीची दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. निरंजन संतोष कालेकर यांच्या मालकीची एम. एच. ०८ ए डब्ल्यू ४८०१ क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी करून ठेवण्यात आली होती. चोरट्याने दुचाकी चोरल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button