मालवण बंदरजेटीवरील पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांच्या ओम मोरेश्वर स्कुबा ड्राइव्हिंग सेंटरचे अतिक्रमण अखेर प्रादेशिक बंदर विभागाने जमीनदोस्त केले.


मालवण बंदरजेटीवरील पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांच्या ओम मोरेश्वर स्कुबा ड्राइव्हिंग सेंटरचे अतिक्रमण अखेर काल (दि.२५) प्रादेशिक बंदर विभागाने जमीनदोस्त केले.यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदर विभागाच्या या कारवाईमुळे बंदरजेटी ते दांडी किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामे केलेल्या व्यावसायिकांचे धाबे दाणणले आहेत.

मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यात नौदल दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मालवण बंदर जेटी परिसरात सुशोभीकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बंदर विभागाने गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु केली आहे. बंदर विभाग कार्यालयाच्या नजिकच बंदर विभागाच्या जागेत दामोदर तोडणकर यांनी जालक्रीडा व्यवसायानिमित्त अनधिकृत शेड उभारले होते. हे शेड हटविण्यासाठी बंदर विभागाकडून तोडणकर यांना गेली अनेक वर्षे नोटीसा बजावण्यात येत होत्या. याबाबत न्यायालयात कायदेशीर लढाईही सुरु होती. मात्र नौदल दिनाच्या निमित्ताने बंदर विभागाने हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

हे अतिक्रमण हटविण्यापूर्वी बंदर विभागाकडून मंगळवार (दि.२४) दामोदर तोडणकर यांना कायदेशीर नोटीस बजावून २४ तासाच्या आत स्व:खर्चाने अतिक्रमण हटवावे, अन्यथा अतिक्रमण हटाव योजनेअंतर्गत हे अतिक्रमण हटविण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र २४ तासात तोडणकर यांच्याकडून अतिक्रमण हटविले न गेल्याने काल (दि.२५) सकाळी दहाच्या सुमारास बंदर विभागाचे आधिकारी पोलीस व दंगा काबू पथकाच्या फौजफाट्यासह अतिक्रमणाच्या ठिकाणी हजर झाले. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने व नगरपालिका सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button