माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अंतरिम जामीन मंजूर

खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावतीने ऍड. अश्‍विन भोसले यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत दररोज पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नगराध्यक्षपदावर कार्यरत असताना नगर परिषदेच्या ठरावातील मूळ मजकुरात बदल करून महत्वाच्या तपशीलाव्यतिरिक्त अधिकच्या मजकुराची नोंद घेवून खोटा दस्तऐवज तयार केल्याचा ठपका वैभव खेडेकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button