
घरडा रुग्णालयाच्या उपकेंद्राचे खेड शहरात उदघाटन
खेड. : घरडा फाउंडेशन संचलित बाई रत्नबाई घरडा चॅरिटेबल हॉस्पिटल लवेलच्या उपकेंद्राचे गुरुवारी दि १८ रोजी खेड शहरात बसस्थानक नजीकच्या विश्वलीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
तालुक्यातील लवेल येथे घरडा कंपनीतर्फे घरडा फाउंडेशन संचलित बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल असून या रुग्णालयात जास्तीत जास्त गरजू रुग्णांना उपचार देत यावेत म्हणून रुग्णालय व्यवस्थापनाने खेड शहरात उपकेंद्र सुरू केले आहे. या उपकेंद्राचे उदघाटन गुरुवारी दि १८ रोजी घरडा फाउंडेशन च्या विश्वस्तांचे प्रतिनिधी जे.के.पाटील, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कलंबनी उपजिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ.गरुड, डॉ.प्रेमसागर जाधव, डॉ.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी राकेश शेळके, डॉ.ठोंबरे, डॉ.मिलिंद महाडिक, शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, अभिषेक पाटणे, बिपीन पाटणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन घरडा रुग्णालयाचे अधिकारी शिवम सोनी, निर्लेप वैद्य, श्रीमती मर्लिन, जनसम्पर्क अधिकारी विवेक बनकर यांनी केले.
www.konkantoday.com