
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक
*रत्नागिरी, दि. 26 (जिमाका):- जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे. भ्रष्टाचाराबाबत कोणत्याही कार्यालयातील तक्रार असल्यास नागरिकांनी पुराव्यांसह, अर्जासह बैठकीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
www.konkantoday.com