आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजितहिंदी नाटक आपकी अमरी
चित्रकार अमृता शेरगील हे भारतीय चित्रकला प्रांतातील एक जबरदस्त नाव! हंगेरियन आई आणि भारतीय बाबा यांच्या पोटी जन्माला आलेल्या अमृताला जेमतेम 28-29 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण या इवल्याश्या आयुष्यात तिने काढलेली चित्रं हा जगभरातल्या चित्रकारांचा अभ्यासाचा विषय ठरला…
चित्राच्या माध्यमातून बोलणाऱ्या अमृताने या काळात जी पत्रे लिहिली ती चित्रकार विवान सुंदरम् यांनी त्यांच्या पुस्तकात संकलित केली आहेत. इतिहास संशोधक आणि लेखक रमेशचंद्र पाटकर यांनी चित्रकार अमृता शेरगील या त्यांच्या पुस्तकात भाषांतरित रुपात समाविष्ट केली आहेत.
हीच पत्र रंगमंचावर नाट्यरुपात आणली आहेत लेखक दिग्दर्शक शेखर नाईक यांनी आपकी अमरी या दोन अंकी नाटकाद्वारे..
अभिनय, प्रकाशाचे खेळ, पार्श्वसंगीत हे सारं फक्त याच संहितेसाठी निर्माण झालेलं असावं इतकी या नाटकाची जबरदस्त भट्टी जमली आहे. दिग्दर्शकीय कौशल्याचा उत्तम नमुना म्हणजे दोन अंकी नाटक आपकी अमरी!
अभिनेते, चित्रकार, आणि नाट्य मंडळींनी पाहिलंच पाहिजे पण नाट्यरसिकांनी मात्र चुकवताच कामा नये असा दोन अंकी अफाट नाट्यानुभव आपकी अमरी!
दिनांक: ३० ऑक्टोबर २०२३
स्थळ: राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे कॉलेज
वेळ: रात्री १०
आर्ट सर्कल सभासदांना मोफत प्रवेश
(जागा मर्यादित असल्यामुळे आपलं येणं सोमवार सकाळ पर्यंत सुनिश्चित केल्यास सोय करणं सोपं जाईल)
*इतरांसाठी तिकीट विक्री कार्यक्रमापूर्वी १ तास हॉलवर. तिकीट दर रु. १००
www.konkantoday.com