अमेरिकेतील लेविस्टन शहरात गोळीबार; २२ ठार, ६० जखमी
अमेरिकेतील मेन राज्यातील लेविस्टन शहरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक लोक जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
रायफलसह संशयित हल्लेखोराची दोन छायाचित्रे फेसबुक पोस्टमध्ये शेअर करण्यात आली असून संशयिताची ओळख पटवण्यासाठी जनतेच्या मदतीचे आवाहन करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले.
www.konkantoday.com