अंगणवाडी मदतनीस पदासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत
*रत्नागिरी, दि.26 ) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 अंतर्गत झाडगाव उद्यमनगर या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस पदे भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी 1, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदीर, रत्नागिरी या पत्त्यावर अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. (गुणपत्रक आवश्यक). – ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील. विधवा / अनाथ असल्याबाबत दाखला (असल्यास दाखला). लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये. जातीचा दाखला असल्यास आवश्यक. अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक. शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT) शासन निर्णय क्र. एबावि-2022/प्र.क्र.94/का-6, द. 2 फेब्रुवारी 2023 नुसार भरती करावयाची असून उमेदवारांनी या शासन निर्णयानुसार अभ्यास करावा.
अधिक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजता या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील, मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जांबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com