लेखी व प्रात्यक्षिक’वर बोर्डाच्या पथकांचा वॉच; परीक्षा केंद्रांवर आता सरमिसळ विद्यार्थी
फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.
दरम्यान, आता बोर्डाने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंमलबजावणीत थोडासा बदल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठविली जाणार आहेत.
दरवर्षी इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा सुरु असताना पेपर सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते. पण, मागच्या वर्षी हा प्रकार बंद करून कॉपी प्रकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न बोर्डाकडून झाला.
यंदाही तो बदल कायम राहणार आहे. दुसरीकडे आता एकाच शहरात एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्रे असतील तर एका केंद्रांवरील मुले दुसऱ्या केंद्रांवर परीक्षा देतील, असाही बदल या वर्षीपासून केला जाणार आहे. ज्याठिकाणी एकच परीक्षा केंद्र आहे, त्याठिकाणी असा बदल नसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती किंवा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे हा बदल असणार आहे. एका दिवशी जिल्ह्यात आलेली बोर्डाची पथके त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बहुतेक शाळांना भेटी देतील. गुणदानातील बनावटगिरी रोखण्यासाठी बोर्डाकडून असा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com