
राज्य परिवहन महामंडळाकडून शाळेतच मिळाला तीन हजार मुलींना एसटीचा पास
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारातील मुलांकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेंतर्गत पासाचे वितरण करण्यात येत आहे. या अंतर्गत आज अखेर २८२३ विद्यार्थीनींना ८ लाख २० हजार रुपयांचे पासेस वितरित करण्यात अले. शहरी बस वाहतुकीमध्ये पह्यिा तीन दिवसात २१ हजार २२७ महिलांनी लाभ घेतला असून यातून महामंडळाला एक लाख ७० हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.सवलतीच्या पहिल्या दिवशी २८५३ महिलांनी प्रवास केला. २४ जूनला ९५८० आणि २५ जूनला ८७९४ महिलांनी शहरी वाहतुकीतून प्रवास केला. www.konkantoday.com