मुके घेतानाचे छायाचित्र शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित करणार्‍या राऊत यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही-रामदास कदम


आम्ही मराठा आहोत, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज- जरांगे यांना ठणकावणार्‍या रामदास कदम यांनी आझाद मैदानातील आपल्या भाषणातून घुमजाव केले.कोकणातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम म्हणाले की, जरांगे आम्ही तुमच्याविरोधात नाही. मराठा आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. सरकारच्या छाताडावर बसा. तज्ञाचे मत घ्या; पण मराठ्यांना टिकावू आरक्षण मिळवून द्या.कारण ओबीसीमधून आरक्षण घेतल्यास ते बांधव विरोध करतील. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता कदम यांनी व्यक्त केली.मराठा मोर्चाला मुका मोर्चा संबोधून महिलांचे मुके घेतानाचे छायाचित्र शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित करणार्‍या राऊत यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button