भारती शिपयार्ड कामगारांना न्याय देण्यास त्यांना जमले नाही म्हणून माझ्यावर आरोप -योगेश कदम
भारती शिपयार्ड कामगारांना न्याय देण्यात आपण यशस्वी ठरलो. जे भाजपाला जमले नाही ते आपण करून दाखवले. यामुळे आपल्यावर आरोप करत आहेत, असा प्रतिवाद आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषद घेवून भारती शिपयार्ड कंपनीतील कामगारांना ४०% देणी देण्यावरून आमदार योगेश कदम यांच्यावर हल्ला चढवला होता. याबाबत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भाजपच्या केदार साठे यांनी पत्रकार परिषद न घेता भेटून आपल्याला हे सांगितले असते तरी चालले असते. कामगारांवर अन्याय नको हा आमचा दोघांचाही उद्देश आहे. त्यांना ते शक्य झाले नाही. मी ते करून दाखवले.