दसऱ्या निमित्ताने रत्नागिरी बाजारपेठेसह जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, लांजा, राजापूर बाजारपेठात मोठी उलाढाल,बाजारपेठेत कोट्यवधींचा उलाढाल झाल्याचा अंदाज
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती दसऱ्याच्या मुहूर्ताला बाजारपेठेत कोट्यवधींचा उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या मुहूर्तावर अनेकजण आपल्या नव्या कार्याचा शुभारंभ करतात. याचाच एक भाग म्हणून सुवर्णकार, वाहन विक्रेते तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांनी दसऱ्यासाठी जोरदार तयारी केली होती. पावसाळ्यानंतर येणाऱ्या या पहिल्या मुहुर्तावर वाहन खरेदीसाठी अॅडव्हान्स बुकिंग झालेले असल्याने, वाहन विक्रेत्यांनी वाहने सज्ज ठेवली.
दसऱ्या निमित्ताने रत्नागिरी बाजारपेठेसह जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, लांजा, राजापूर व देवरुखसह शृंगारतळी या प्रमुख बाजारपेठा सजल्या होत्या. विशेषतः सुवर्णकारांनी आपल्या पेढ्यांना विजेची आकर्षक रोशणाई केली होती. येत्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिक दसऱ्याचा मुहूर्त साधत सोने खरेदी केली. रात्री उशिरा पर्यंत सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होती.
सोन्या-चांदीप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकानेही विविध योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक अशा स्कीम ठेवल्या होत्या. मागील काही वर्षात नामांकित कंपन्यांनी रत्नागिरीत शोरुम सुरु करीत, ग्राहकांसमोर अनेक पर्याय ठेवले. सोन्याचा आणि वाहन दुकानानंतर इलेक्ट्रॉनिक दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
www.konkantoday.com