
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना रत्नागिरी यांचा कंत्राटी आरोग्य सेविका यांच्या संपाला पाठींबाजिल्हा अध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यानी दिले पाठिंब्याचे पत्र
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका सहाय्यिका यानी आज पासून पुकारलेल्या त्रिदिवशीय बेमुदत संपला जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संधटनेने पाठिंबा दिल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर व राज्य संघटक श्री. गजानन साळुंखे यानी संप कर्त्या आरोग्य सेविका याना प्रत्यक्ष भेटून दिले या वेळी शासनाने गेली 15/20 वर्ष आरोग्याचे कमी वेतनात काम करत असलेल्या या भगिनींना कायम करावे व त्याना शासन सेवेत समायोजित करावे अशी आमच्या राज्य संघटनेचीही मागणी आहे. शासनाने याचा विचार करावा या साठी आम्ही ही आपल्या सर्वांसोबत आहोत असे आश्वासन दिले.
www.konkantoday.com