
खेड-भरणे येथे तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने विचित्र अपघात
मुंंबई-गोवा महामार्गावरील काळकाई मंदिराजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील एकजण जखमी झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणार्या एका चारचाकी वाहानाने वळण घेत असलेल्या दुसर्या चारचाकी वाहनाला धडक दिली. याचवेळी दुचाकीवरून पहिल्या पाठीमागून आलेल्या वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. स्थानिकांच्या मदतीने जखमी दुचाकीस्वारास खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.