कणकवली तालुक्यात युवतीवर अत्याचार करणार्या तिघांना अटक
२१ वर्षीय युवतीवर तिचा प्रियकर व त्याचे मित्र, अशा तिघांनी शारिरीक अत्याचार केल्याचा गुन्हा कणकवली पोलिसांत दाखल झाला आहे. पीडित युवतीने गुरूवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल असलेले युवतीचा प्रियकर बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, मूळ केळवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी व सध्या रा. नाद, ता. वैभववाडी), रिक्षाचालक शैलेश शांताराम तांबे (३४, दारूम) व गणेश प्रकाश गुरव (२०, शिरवली, ता. देवगड) यांना पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरामधून अटक केली. तिन्ही संशयितांची पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली.