उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्त्या रद्द
राज्यभरातील जिल्हा ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून अध्यक्ष व सदस्य पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कायदेविषयक अभ्यासक्रम योग्य नसल्याचे सांगत कोर्टाने नियुक्त्या रद्द केल्या.
रत्नागिरी जिल्हा ग्राहक आयोग अध्यक्षपदी अरूण गायकवाड तर सदस्यय म्हणून स्वप्नील मेघे व अमृता भोसले, सिंधुदुर्ग अध्यक्षपदी इंदुमती श्रेयस मलुष्टे तर सदस्य म्हणून योगेश यशवंत खाडीलकर व अर्पिता पराग फणसळकर यांची नियुक्ती जाहीर झाली होती.